आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार : चंद्रशेखर बावनकुळे

आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
  • MG News
  • मे 24 2025

Share on  

जनतेचा विकास या एकाच मुद्यावर स्थापन झालेल्या, महायुतीत आगामी स्थानिक स्वराज संस्थेचा निवडणूका एकत्रच लढण्याबाबत मतैक्य असून कोणी काही म्हटले तरी त्यात बदल होणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.  पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.प्रफुल पटेल, धर्मराव बाबा आत्राम काय बोलले, हे मला माहित नाही. पण भाजपची भुमिका आहे. की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढायच्या. आणि तेच होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या संदर्भात बाबा आत्राम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत उत्तर देतांना केला  
अवकाळी पावसामुळे बाधीत सर्व शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाई मिळाले.मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याबाबत जातीने लक्ष घालत आहेत‌. असे त्यांनी अवकाळीच्या मुद्यांवर बोलताना सांगितले 
यावेळी त्यांनी संसदीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकुन टिका केली.राहूल गांधी यांना काही समजत नाही. ते अभ्यास करत नाही. नाही समजलं तर शिकून घ्यावं. त्यांचा एक नेता म्हणतो ते १५००० चं ड्रोन होतं. यांना काय झालं कळत नाही. जे देशाला नाही समजले ते काय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करतात. राहूल गांधी यांना वर्षाला दोन दोन महिने विदेशात रहायचं आहे. आणि ते मोदी जी यांना धोरणं शिकवणार मोदी यांनी दहशतवादी विरोधात लढाईसाठी जगभरातील देशांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. यासाठीच खासदारांना पाठवण्यात आलंय. 
पांदण रस्त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बैलताना- गेल्या ४० वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती, आमच्या शेतातील रस्त्यावरून बैलगाडी, ट्रॅक्टर गेला पाहिजे. यासाठी सरकारी पांदण रस्त्यावर अतिक्रमण झालं, ते काढण्याची मागणी होती. ती मान्य झालीय  आता महसूल विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करतील.- शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चांगले पांदण रस्ते १२ फुटाचे होणार 
 लाडक्या बहिणीच्या योजनेचं हेड वेगळं आणि आदिवासी समाजाच्या निधीचं हेड वेगळं आहे. सामाजिक न्यायचं वेगळं आहे. त्यामुळे इकडचे तिकडे करता येत नाही. त्यामुळे हा खोटारडेपणा आहे. काहीतरी बातम्या देऊन सरकारचं नाव बदणाम करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी लाडकी बहिण निधीच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या टीकांबाबत सरकारची भुमिका मांडतांना  सांगितले.

संबंधित बातम्या