मालेगाव बॉम्बस्फोटाचा उद्या निकाल लागण्याची शक्यता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा उद्या निकाल लागण्याची शक्यता
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

मालेगावच्या भिक्खू चौकात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल उद्या ३१ जुलै येण्याची शक्यता असून, १७ वर्षांनंतर निकाल लागत असल्याने काय निकाल लागतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मृत व जखमींच्या  कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. न्याय देवतेवर विश्वासही व्यक्त केला आहे.
 २९ सप्टेंबर २००८ साली सायंकाळच्या सुमारास  मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात सहाच्या वर निष्पाप नागरिक मृत्यूखी पडले होते. तर १०० वर नागरिक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह यांची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. 
 उद्या ३१ जुलैला या खटल्याचा निकाल लागल्याची शक्यता झाली. त्यामुळे हा खटला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना आजही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. त्यापैकी  एक असलेली लियाकत शेख यांची १० वर्षाची चिमुरडी फरहीन मृत्युमुखी पडली होती. फरदिन पाववडा आणण्यासाठी भिक्खू चौकात गेली असता, त्यात ती गतप्राण झाली होती. आजही तिचे वृद्ध वडील व कुटुंब तिच्या आठवणीत जगत आहेत, न्यायालयावर विश्वास आहे. न्याय नक्की मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या