देवळाली कॅम्प परिसरातुन महिलेची छेड काढणाऱ्यास अटक

देवळाली कॅम्प परिसरातुन  महिलेची छेड काढणाऱ्यास अटक
  • MG News
  • मे 26 2025

Share on  

पाण्याचा दाब तपासायचा आहे असे सांगत घरात प्रवेश करतं घरातील  महिलेची छेड काढणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एक व दोनच्या पथकाने संसरी गावातून पकडले. सुशील अनिल ठाकूर, राहणार हरीधाम अपार्टमेंट, संसरीगाव, असे संशयिताचे नाव आहे,.शुक्रवारी पाण्याचा दाब तपासायचा आहे, असे सांगता आरोपीने महिलेच्या घरात प्रवेश केला होता, त्यानंतर  महिलेसह तिच्या बाळास जीवे मारण्याची धमकी देत तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चोरट्याने घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा 4 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला होता.  गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने राका कॉलनी परिसरात सापळा रचून संशयित ठाकुर यास पकडले. अंगझडतीत 1 लाख 36 हजार 700 रुपयांची रोकड व मोबाइल आढळून आला. तर जबरी चोरीतील सोन्याचांदीचे दागिने त्याने नाशिकरोड येथील सराफास विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत सराफाकडून 3 लाख 18 हजार रुपयांचे दागिने जप्त केले. पोलिसांनी संशयित सुशीलचा ताबा देवळाली कॅम्प पोलिसांना सोपवला आहे.

संबंधित बातम्या