कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन, त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा. अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन ही, मागणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषिमंत्री कोकाटे सतत शेतकरी विरोधी वक्तव्य करत असून, विधिमंडळात प्रश्नोत्तरांच्या तासात ते रमी खेळतात, त्यांचं कामात लक्ष नाही. त्यामुळे अशा मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकला अन्यथा आंदोलन करू. असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे