माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

 माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आस्था असणारा असावा. त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा, अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जे कृषिमंत्री मिळाले आहेत, त्यांची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येते आहे. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे. हे त्यांनी सभागृहात बसून रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे. 

वंचित बहुजन आघाडीची ठाम आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की, माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे, त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाइन जुगार खेळत असतील, तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनाने द्यावी. त्यांना मंत्रिपदाच्या कामात अडकवून ठेवू नये. जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता येईल, यासाठी तातडीने त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे. 
 

संबंधित बातम्या