तडीपार केलेल्या आरोपींचा आका,जरांगे' असल्याचा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय. ते जालन्यात बोलत होते. जरांगेंच्या मेहुण्याच्या तडीपारीवर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
तडीपारीच्या कारवाई केलेल्या आरोपींना जेलमध्ये टाकायला पाहिजे. पोलिसांनी ज्या आरोपींवर तडीपारीची कारवाई केली आहे ते पोलीस आणि महसूल विभागाला उशिरा शहाणपण सुचलेलं शहाणपण असल्याची टीकाही वाघमारे यांनी केलीय. मोठ्या आकाला जेलमध्ये टाका असं म्हणत वाघमारे यांनी जरांगेंना जेलमध्ये टाकण्याची मागणी केलीय. या माफियांच्या पैशांवर जरांगेंचं आंदोलन चालतं.जरांगेंच्या मेहुण्याला तडीपार केलं म्हणून जरांगेंनी उपविभागीय अधिकाऱ्यांना धमकवण्याची भाषा केली,त्यामुळे जरांगेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणीही वाघमारे यांनी केली आहे.जरांगेला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा अशीही मागणी वाघमारे यांनी केली.