मनोज जरांगे पाटलांमुळे या तपासाला गती आली - ज्ञानेश्वरी मुंडे

मनोज जरांगे पाटलांमुळे या तपासाला गती आली - ज्ञानेश्वरी मुंडे
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

आज बीडमध्ये परळी येथील मयत महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी आणि पुढील लढाई कशी लढायची ? यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व समाजातील नागरिकांनी यावे, असे आवाहन देखील करण्यात आले होते. तर याच बैठकीसाठी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे देखील बीडमध्ये आल्या आहेत.
 यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं की, मनोज जरांगे पाटलांचे मोठेपण म्हणावे लागेल की, त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीला न्यायासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. 
आज सर्व समाजातील नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे आम्ही देखील या बैठकीसाठी आलो आहोत. आणि यापुढचा लढा मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून लढवला जाणार आहे. 
या लढ्याला विष प्राशन केल्यानंतर गती आली आहे. चौकशी सुरू आहे, मुख्यमंत्र्यांची भेट झाली, जितेंद्र आव्हाड यांनी देखील लक्ष घातले, सुप्रिया सुळेंनी देखील लक्ष घातले, आणि हे सर्व मनोज जरांगे पाटलांमुळे झाले आहे. असं म्हणत त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या