नवी मुंबईतून क्लीनरचे अपहरण केल्याबद्दल पूजा खेडकरचे आई-वडील दिलिप खेडकर आणि मनोरमा खेडकर या़ंच्यावर नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र ३० ऑगस्टला मनोरमा खेडकर यांना १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र हा जामीन देताना मनोरमा खेडकर यांनी पोलीसांना तपासात सहकार्य करण्याची अट घातली होती. मात्र मनोरमा खेडकर या त्यानंतर गायब झाल्या असून पोलीसांचा त्यांच्याशी संपर्क होत नाहीये.
त्यामुळे रबाळे पोलीसांनी खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर चौकशीला हजर राहण्याची नोटीस चिकटवली होती. मात्र काही वेळापुर्वी ही नोटीस देखील फाडण्यात आली आहे.