मराठा हायस्कूल मध्ये कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे यांची जयंती उत्साहात साजरी

मराठा हायस्कूल मध्ये कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे यांची जयंती उत्साहात साजरी
  • MG News
  • ऑक्टोबर 2 2025

Share on  

 मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक संजय ठाकरे,पर्यवेक्षक देविदास भारती,विजय पवार व प्रताप काळे उपस्थित होते 
     कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली कर्मवीर ॲड .विठ्ठलराव हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. ईशान सोनवणे व प्रणाली मकवान यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
    अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक थोरात सर म्हणाले उभ्या महाराष्ट्रात लढाऊ नेते म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर ॲड.विठ्ठलराव हांडे म्हणजे सक्षम नेतृत्व होते.नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक,सामाजिक विकासात त्यांचे योगदान खूप मोठे होते.शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचावी यासाठी ते खूप वर्ष मराठा विद्या प्रसारक संस्थेत कार्यरत राहिले.त्याचबरोबर जनसामान्यांच्या आवश्यक प्रश्नासाठी अनेक चळवळी त्यांनी उभ्या केल्या. शेतकऱ्यांचे,शेतमजुरांचे,कष्टकऱ्यांसाठी अनेक मोर्चे त्यांनी काढले.असे ते आपल्या मनोगतात म्हणाले. 
      सूत्रसंचालन हेमाक्षी हांडगे व साई बत्तासे यांनी केले.आभार समिधा थोरात व समीक्षा काळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 

संबंधित बातम्या