मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या वयोगट १७ वर्षाआतील मुलांच्या संघाची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विद्यालयात संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे (सरचिटणीस मविप्र समाज नाशिक) ,विद्यालयाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात,उपमुख्याध्यापक संजय ठाकरे,पर्यवेक्षक देविदास भारती,विजय पवार व प्रताप काळे उपस्थित होते.
सर्व खेळाडू कामोठे पनवेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच उत्तुंग भरारी घेत असतात व संस्थेच्या,शाळेच्या नावलौकिकात भर पाडत असतात विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट निश्चितच साध्य होत आहे. असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
संघांच्या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नाशिक शहर तालुका संचालक ॲड.लक्ष्मण लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश पिंगळे,चांदवड तालुका संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड,व सर्व संचालक मंडळ,मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ. भास्करराव ढोके,शालेय समिती व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व खेळाडूंना राजाराम पोटे,सुहास खर्डे,मंगला शिंदे, हरिभाऊ डेलेॅ,अनिल उगले,सुयश कुंभार्डे यांचे मार्गदर्शन लाभले.