मराठा सेवा संघ सातत्याने अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी आणि परंपरा नष्ट करण्यासाठी तसेच समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. सामाजिक समतोल प्रस्थापित होण्यासाठी ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना श्रम, बुद्धी व कौशल्याने सहाय्य करणे आवश्यक आहे. मरण आणि तोरण प्रसंगी अनाठायी खर्च टाळावा तसेच पालकांनी मुला-मुलींवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. शिवरायांचा इतिहास केवळ ढाल-तलवारींचा नसून, तो विचारांचा आहे. शिवचरित्राचे सखोल आकलन प्रत्येक नागरिकाने करून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी सातपूर येथे केले.
मराठा सेवा संघ सातपूर विभाग कार्यकारिणीच्या वतीने आयोजित “मराठा स्नेहसंवाद व समन्वय दौरा” मौले रामजी हॉल येथे पार पडला. अध्यक्षस्थानी ॲड. खेडेकर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हभप धनंजय रहाणे यांनी जिजाऊ वंदना सादर केली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.अर्जुन तनपुरे, राज्य समन्वयक दीपक भदाणे,नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसाद सोनवणे, महानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुगंधी (कापसे), प्रा. ज्ञानोबा ढगे, जिल्हा कार्याध्यक्ष विद्या चव्हाण, शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब जाधव, विभाग समन्वयक राजू पाटील, विभाग प्रमुख सचिन उशिर, वसंत सोनवणे, श्रीपाद भदाणे, सुधीर सोनवणे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे, समन्वयक सुमन हिरे आणि उपाध्यक्ष योगिता सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले. त्यांनी सांगितले की, मराठा सेवा संघ शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आदी विविध सामाजिक विषयांवर सातत्याने काम करत आहे.
विभाग समन्वयक राजू पाटील यांनी सातत्याने सातपूर परिसरात जनजागृतीसाठी मेळावे घेऊन समाजप्रबोधनाचे कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सातपूर विभागातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
मार्गदर्शक म्हणून संजय तांबे, विवेक हासे, प्रभाकर कदम, विनोद पाटील, सल्लागार म्हणून दीपक देसले व रवी देवरे, तर विभाग सहसंघटक श्रीपाद भदाणे, गणेश भावले, कार्याध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष विलास जाधव, खजिनदार संदीप पाटील, सचिव प्रशांत रौंदळ व नितीन पाटील, तसेच उद्योग आघाडी अध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
प्रमुख अतिथी प्रा. अर्जुन तनपुरे यांनी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी समाजात समन्वय व एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले.
तर महानगर जिल्हाध्यक्ष नितीन सुगंधी (कापसे) यांनी नाशिक महानगरातील पाचही विभागांमध्ये संघटनबांधणीचे काम सुरू असल्याचे सांगून, “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे उद्योग, व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करून समाज उन्नतीचा मार्ग धरूया, असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी किसनराव खताळे, जमधाडे काका, अशोक गवळी, रामहरी संभेराव, शिवाजी सहाणे, सर्जेराव शिंदे, रामनाथ शिंदे, संजय तांबे, शिवाजी शिंदे, अशोक शिंदे, बाळासाहेब बोरसे, अभिमन्यू गुडघे, भीमराव एरंडे, शिवाजी कांडेकर, संजय पाटील, सोमनाथ कासव, अरुण लांडगे, संतोष मोढवे, बागुल काका, दिनकर पाटील, विजय शिरसाठ, सुनंदा पाटील, मोरे मावशी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
उद्योग व्यवसाय उल्लेखनीय भरारी घेणाऱ्या कोमल मसाले च्या संचालिका योगिता व सुधीर सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भदाणे यांनी केले, तर सातपूर विभाग अध्यक्ष सचिन उशिर यांनी आभार मानले.