नशेसाठी गोळ्या पुरवणाऱ्या मेडिकल चालकाला अटक, नशाविरोधी मोहिमे अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई

नशेसाठी गोळ्या पुरवणाऱ्या मेडिकल चालकाला अटक, नशाविरोधी मोहिमे अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

नशेसाठी गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या पुरवठादारासह मेडिकल चालकाला बीड शहर पोलिसांनी अटक केलीय. शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात चार जणांना तेव्हा अटक केली होती. त्यांच्याकडून अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडीन सायरपसह एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना शेख फारुक शेख आरेफ रा. इस्मालमपूरा बीड, या मेडिकल चालकाने या गोळ्यांची विक्री केल्याचे समोर आले होते. त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन रा. शहेंशाहर नगर बीड, याने गोळ्या पुरवठा केल्याचे समोर आले. आता त्यालाही पोलिसांनी अटक केलीय. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ६ झाली आहे. 

संबंधित बातम्या