गणुर शाळेत 'सही पोषण देश रोशन' या संकल्पने अंतर्गत मुलांना दुधाचे वाटप

गणुर शाळेत 'सही पोषण देश रोशन' या संकल्पने अंतर्गत मुलांना दुधाचे वाटप
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले आहे, सही पोषण देश रोशन या अभिनव ग्रुपने दर शनिवारी विद्यार्थ्यांना पोषणमूल्य पूर्ण गरम दूध, खीर, किंवा बासुंदी दिले जात आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ ठाकरे यांच्या संकल्पनेतून व पुढारकारातून हा स्तुत्य उपक्रम जात आहे या उपक्रमाचा शुभारंभ मराठा विद्या प्रसारक संस्थेची सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांच्या नावाने केला तर यावेळी दूध वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ ठाकरे यांच्या हस्ते झाले.
यानंतर ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांनी केले आहे. 

त्याच अनुषंगाने आज दिनांक 2 ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात सोबतच कधी गोड भात खीर गोड शिरा ही दिला जातो याच अनुषंगाने दूध वाटप करण्यात आले. 

यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दसरथजी संतोष ठाकरे, ग्रामस्थ संजय दामू ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक श्याम जगन्नाथ बच्छाव, शाळेचे शिक्षक वृंद श्रीमती कविता कैलास भालेराव, श्रीमती रतनमाला रामदास बागड ,राहुल अशोक ठाकरे ,प्रतिभा कैलास शिंदे ,सौ जयश्री संजय ठाकरे आदी उपस्थित होते. 

संबंधित बातम्या