कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मंत्री हसन मुश्रीफ लवकरच राजीनामा देणार आहेत. 'एक कुटुंब, अनेक पदे' या टीकेला पूर्णविराम देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. गेली ४० वर्षे जिल्हा बँकेत सक्रिय असलेले मुश्रीफ हे मागील साडेतेरा वर्षांपासून अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता आहे.