शासकीय धानाचा अपहार उघड; राइसमिल, वाहनमालकावर गुन्हा होणार दाखल, लीना बनसोड यांचे कारवाईचे निर्देश

शासकीय धानाचा अपहार उघड; राइसमिल, वाहनमालकावर गुन्हा होणार दाखल, लीना बनसोड यांचे कारवाईचे निर्देश
  • MG News
  • मे 23 2025

Share on  

आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात येत असलेले धान (भात) राइस मिलऐवजी सुरगाणामार्गे गुजरातमध्ये विक्री करून त्याचा अपहार होत असल्याचे महामंडळाच्या चौकशी अहवालात समोर आले. त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी याप्रकरणी सिन्नर येथील मे. रेणुका राइस मिलचे मालक राहुल भागवत आणि वाहनमालक सौरभ राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह राइस मिलबरोबरचा करारनामा रद्द करून ठेकेदाराची बँक गॅरटीही जप्त करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.आदिवासींच्या विक्री केलेल्या धानावर प्रक्रिया करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत  सिन्नर येथील मे. रेणुका राइस मिलबरोबर करार केला आहे. मिलने खरेदी केंद्रांवरील धान भरडाइसाठी मिलमध्ये आणणे अपेक्षित होते. परंतु, मिलमध्ये न आणता त्याची गुजरातमध्ये विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता.

संबंधित बातम्या