आमदार रोहित पवार यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

आमदार रोहित पवार यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची घेतली भेट
  • MG News
  • जुलै 30 2025

Share on  

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी परळीतील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंसह कुटुंबीयांना धीर दिला आहे.
महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, ही मागणी घेऊन बीडच्या कनेरवाडी येथे 3 दिवसापूर्वी रस्ता रोको करण्यात आला होता. तर या रस्ता रोकोप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह नातेवाईकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता आमदार रोहित पवार यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली असून माहिती देखील घेतली आहे. दरम्यान यावेळी मुंडे कुटुंबियांना धीर देत त्यांनी त्या ठिकाणाहूनच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी देखील फोनवरून संवाद साधला. मुंडे खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा, मनात विविध विषयांवर चर्चा देखील केली आहे.

संबंधित बातम्या