हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण राज्यभर आक्रमक झाली असून हिंदी भाषा सत्तेच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने धुळ्यात पारंपारिक खंडोबाचा गोंधळ घालून हिंदी भाषा शक्तीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हे निषेधनात्मक आंदोलन करण्यात आले. हिंदी भाषा साठीचा निर्णय घेणारे महाराष्ट्र सरकार हे षंढ सरकार असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.