पाकिस्तानला सीमा असणाऱ्या गुजरात, राजस्थान, पंजाब या राज्यांसह जम्मू काश्मीर या केंद्रशासीत प्रदेशांमध्ये सुरक्षीतेचा कारणास्तव केंद्र सरकारतर्फे पुन्हा एकदा मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. उद्या गुरुवारी हे मॉक ड्रिल होइल.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध मोठ्या प्रमाणात ताणले जावून, युद्ध सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तान कडून होवू शकणारे संभाव्य आक्रमण लक्षात घेवून, गेल्या ७ मे रोजी भारतात विविध ठिकाणी युद्धजन्य स्थिती उद्भवल्यास त्याला सामोर जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांची किती तयारी आहे. याची माहिती करुन घेण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. जे यशस्वी ठरले होते.त्याच दिवशी मध्यरात्री भारताने दहशतवादी तळांचा वेध घेणारे ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यामुळे बिथरून पाकिस्तानने भारताच्या नागरी वसाहतीवर हल्ला केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानात छोटे युद्ध होवून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली .ज्याची पाकिस्तानने एकतर्फी जाहिर केलेली मुदत संपल्याने, पाकिस्तान पुन्हा हल्ला करु शकतो, हे लक्षात घेवून या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.