भिवंडीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशामक विभाग व आपत्कालीन विभागाच्या वतीने मॉक ड्रिल
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी भिवंडीतील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने आज मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. ही मॉक ड्रिल शहरातील काटेकर येथील वऱ्हादेवी तलाव या ठिकाणी पार पडली. यात आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घेतला. या मॉक ड्रिलमध्ये पूरस्थितीत नागरिकांची तात्काळ मदत व स्थलांतर कसे करावे याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.