मुंबई : राज्यातील १६ ठिकाणी होणार मॉक ड्रिल.
भारत पाकिस्तान यांच्यातील संभाव्य युद्ध बघता, सुरक्षिततेचा उपाय बघता राज्यातील
मुंबई, तारापूर,उरण,ठाणे,पुणे,नाशिक,रोहा मनमाड,सिन्नर, पिंपरी चिंचवड,,थळ वायशेत, भुसावळ, रायगड,रत्नागिरी सिंधूदूर्ग,छत्रपती संभाजीनगर या १६शहरात
मॉक ड्रिल होणार आहेत.यावेळी सरकारी कार्यालये ,पोलीस स्टेशन येथे सुरक्षितेचे भोंगे वाजवण्यात येणार आहे.भोंगे वाजवल्यावर नागरिकांनी घाबरून न जाता मोकळ्या जागा सोडून सुरक्षीत बंदिस्त जागी आश्रय घ्यावा. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.प्रशासनातर्फे संवेदनशीलतेचा विचार करता अतिसंवेदनशील आणि संवेदनशील भाग १आणि संवेदनशील भाग २असी विभागणी करण्यात आलेली आहे .अतिसंवेदनशीलमध्ये
मुंबई, ऊरण,आणि तारापूर यांचा समावेश करण्यात आला आहे..संवेदनशील भाग १मध्ये
,ठाणे,पुणे,नाशिक,रोहा मनमाड,सिन्नर, पिंपरी चिंचवड, रायगड जिल्ह्यातील थळ वायशेत, यांचा तर संवेदनशील भाग २मध्ये भुसावळ, रायगड,रत्नागिरी सिंधूदूर्ग,छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे,असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.