मुलाचा प्रेमविवाह मान्य नसल्याने सासूनेच केला सुनेचा गर्भपात

मुलाचा प्रेमविवाह मान्य  नसल्याने सासूनेच केला सुनेचा गर्भपात
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

नाशिकमध्ये विवाहितेचा छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना अजून एक विवाहितेच्या छळाची समोर आली आहे.  मुलाचा प्रेमविवाह मान्य नसल्याने नर्स असलेल्या सासूनेच सुनेचा गोळ्या देऊन गर्भपात करण्याची घटना घडली आहे या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून पती भूपेश पाठक सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक,नणंद स्मिता पाठक याना अटक करण्यात आलेली आहे,  न्य्यालायने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे
आंतरजातीय प्रेमविवाह सासरच्या मंडळींना मान्य नसल्याने पीडितीचा कायम जतिवाचक उल्लेख करत तसेच्या माहेरच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख करत सासरच्या मंडळींकडून अपमान करण्यात येत असे. तसेच या घटनेच्या आधी एकदा आणि आता असे दोनदा गर्भधारणा होऊन गर्भपात करण्यास भाग पडल्याने तसेच हे होऊन सुद्धा सासरची मंडळी नांदवत नसल्याने पीडितेने त्रास अश्या झाल्याने पोलिसात टँकर केली असता सदार घटना उघडकीस आली . 

संबंधित बातम्या