मुक्ताईनगर: शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये एक लाख अनुदान द्या काँग्रेसची मागणी

मुक्ताईनगर: शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये एक लाख अनुदान द्या काँग्रेसची मागणी
  • MG News
  • सप्टेंबर 26 2025

Share on  


ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना  सरसकट हेक्टरी रुपये एक लाख सानुग्रह अनुदान द्या अशी काँग्रेसची मागणी आहे. 
या मागणीसाठी काँग्रेसने  मा. तहसीलदार मुक्ताईनगर यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिले.  निवेदन देतेप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्हिजेएनटी विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले,प्रवक्ते एडवोकेट अरविंद  गोसावी ,उत्तर महाराष्ट्र इंटक काँग्रेसचे अध्यक्ष संजय चौधरी पाटील ,सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील,  मुक्ताईनगर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रब्बानी, अंतुर्ली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख भैय्या शेख करीम, काँग्रेस कार्यकर्ते व तालखेडा परिसरातील  शेतकरी बांधव उपस्थित होते.बऱ्याच दिवसापासून सुरू  असलेल्या पावसाने पिके जमीन दोस्त झालेली आहे. सद्या स्थितीत ढगफुटी होणे, पुर सदृश्य स्थिती,अतिवृष्टी,तोंडी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांची केळी ,कापूस,सोयाबीन, मका व इतर पिके मातीमोल  झाली आहे.कमी भावात व्यापारी खरेदी करीत आहेत. शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे हतबल,हताश झाला आहे शेतकऱ्यांपुढे दररोज नवीन नवीन समस्या निर्माण होतात त्यामध्ये निसर्गाची अवकृपा,  वादळी वारे,विजेचा लपंडाव, रासायनिक खतांची कमतरता, रासायनिक  खताचे भाव गगनाला भिडले आहे.अति पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे असलेले पीक वाहून गेलेले आहे ,सडलेले आहे ,कुजले आहे .त्यामुळे पिकांवर रोगराई झाल्यामुळे फवारणीसाठीची औषधे सुद्धा कुचकामी ठरली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी रुपये एक लाख सानुग्रह अनुदान सरसकट देण्यात यावा.


एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर

संबंधित बातम्या