गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मेंढपाळांच्या मेंढी चोरीचे प्रकार तसेच मेंढपाळांच्या वाड्यावर दरोडे टाकण्याचे प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे मेंढपाळांचं जीवन असुरक्षित बनलेलं आहे. तेव्हा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणात दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत. दरोडेखोरांना तात्काळ अटक करावी. आणि मेंढपाळांचा मुद्देमाल जप्त करून तो मेंढपाळांना परत मिळवून द्यावा .
भारतीय घटनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट आहे. अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात म्हणून राज्यातील धनगर समाज अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने आंदोलने करून मागणी करीत आहे. परंतु शासन त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असून उलट धनगर समाजाला असलेल्या ओबीसीच्या सवलती काढून घेण्याचं पाप करण्यात येत आहे. ही बाब आम्ही कदापि सहन करू शकणार नाही.
गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये मेंढपाळांच्या वाड्यावर रात्री दरोडे टाकून सोनं, पैसा, मेंढ्या चोरून देण्याचे प्रकार वाढलेले आहेत. अनेक ठिकाणी धनगर समाजाच्या मेंढपाळांच्या महिलांची अब्रू लुटण्याचे काम सुद्धा दरोडेखोराकडून करण्यात येत आहे. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा परवाना मिळावा ही अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे. तेव्हा महाराष्ट्रातील मेंढपाळांना बंदुकीचा परवाना द्यावा. अशी मागणी करण्यात येत आहे .
वरील सर्व मागण्या बाबत प्रशासनाने आठ दिवसात कारवाई करावी अन्यथा जय मल्हार सेनेच्या वतीने व मुक्ताईनगर तालुक्यातील समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. याची नोंद घ्यावी
निवेदक -
लहू शेवाळे, रवी पवार, रवींद्र पाचपोळ, मीठाराम ठेलारी, जितेंद्र जुमडे, गजानन कवडे, बाळाभाऊ चिंचोले, सुभाष कचरे, गजानन कवडे, विजय सावळे, नरेंद्र पवार, सचिन धनगर
संदीप सावळे, नंदकुमार धनगर, ज्ञानेश्वर सावळे.
एमजी न्यूज ज्ञानेश्वर सावळे मुक्ताईनगर