मुंबई : बलूच आर्मीच्या भीषण हल्ल्यात 14 पाक सैनिक ठार

मुंबई : बलूच आर्मीच्या भीषण हल्ल्यात 14 पाक सैनिक ठार
  • MG News
  • मे 9 2025

Share on  

 मुंबई:बलूच आर्मीच्या भीषण हल्ल्यात 14 पाक सैनिक ठार.

       भारताकडून आधी 'ऑपरेशन सिंदूर' आणि त्यापाठोपाठ केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानला आता बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) जोरदार तडाखा देऊन पाकच्या 14 सैनिकांचा खात्मा केला आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या बलुच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी हा हल्ला बोलानमधील माछकुंड येथे केला. यात त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे वाहन रिमोटच्या मदतीने उडवून दिले. त्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात किमान 14 सैनिक ठार झाले. याआधीही 'बीएलए'ने पाकिस्तानी सैन्यावर केच जिल्ह्यातील किलाग भागात हल्ला केला होता. त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यात आले. त्यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते.

भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे घायकुतीला आलेल्या पाकिस्तानला बलुच लिबरेशन आर्मीने खिंडीत गाठल्याने पाक सैन्याची कोंडी झाली आहे. एकाचवेळी पाक सैन्याला भारत आणि बलुच लिबरेशन आर्मीशी दोन हात करावे लागत आहेत

संबंधित बातम्या