मुंबई  : छगन भुजबळांची स्पष्टोक्ती : "ओबीसी आरक्षण मिळालं, साप-शिडीचा खेळ सुरूच आहे"

मुंबई  : छगन भुजबळांची स्पष्टोक्ती :
  • MG News
  • मे 22 2025

Share on  

मुंबई  : छगन भुजबळांची स्पष्टोक्ती : "ओबीसी आरक्षण मिळालं, साप-शिडीचा खेळ सुरूच आहे"

              मुंबई : राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज एका जोरदार पत्रकार परिषदेत आपले मन मोकळे करत अनेक राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य केले.

"देर से आया, दुरुस्त आया", असे म्हणत त्यांनी आपल्या हालचालींचा बचाव केला, तर "जो मंजूर ए खुदा होतं, तेच होतं" या उक्तीने राजकारणात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांना उत्तर दिलं.

     "ओबीसी आरक्षण मिळालं आहे, पण हा साप-शिडीचा खेळ आहे. थोडं वर गेलं की खाली. चालूच आहे... काय करणार?"– छगन भुजबळ

शरद पवारांसोबत जाण्याचं कारण

भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, "शरद पवार यांच्यासोबत जाण्याचं कारण सगळ्या समाजाला न्याय देणं होत." मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाच्या टप्प्यांची आठवण करून दिली.

मोदी, फडणवीस यांच्यासोबत संपर्क

भुजबळ यांनी सांगितले की, "मागच्या मंगळवारी मीटिंग झाली आणि शपथ घ्यायची असं ठरलं, पण कोणालाच मी सांगितलं नाही." त्याचबरोबर, "मोदी आणि अमित शहा यांनी सांगितलं की हे दुरुस्त करायला पाहिजे, फडणवीसांनीही प्रयत्न केले," असे त्यांनी स्पष्ट केले.

  नाशिकचा विकास आणि पालकमंत्रीपद

"मी नाशिकचा बालक आहे. पालकमंत्री असताना नाशिक-मुंबई रस्ता, त्र्यंबक रस्ता, बोट क्लब, इनर आणि आउटर रिंग रोड यांसारखी कामं केली," असे नमूद करत, त्यांनी नाशिकच्या प्रगतीचा आढावा दिला.

  ओबीसी आरक्षण आणि जातगणना

"ओबीसी आरक्षण मिळालं आहे. सिन्नरमध्ये ४ गावांत ४ ओबीसी आहेत – हे दाखवायला जातगणना हवी," असे ठाम मत मांडत, त्यांनी ओबीसी समाजासाठी लढा सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. "लाडक्या बहिणी सोबत ओबीसींची ताकद मिळाली, हे मी फडणवीस यांना सांगितलं," असेही त्यांनी नमूद केले.

  राजकीय ताशेरे

"काही लोक थोड्या वेळ त्या घरात, थोड्या वेळ या घरात असतात – अशांना दुःख कळत नाही," असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी राजकीय पाला बदलणाऱ्यांना लगावला.

संबंधित बातम्या