मुंबई: भारताशी पंगा घेणे महागात : पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर

मुंबई: भारताशी पंगा घेणे महागात : पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

मुंबई: भारताशी पंगा घेणे महागात : पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली केली. आज (7 मे) दहशतवादी हल्ल्याच्या बरोबर 15 दिवसांनी, भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे नष्ट करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे.
गरिबीतून जात असलेला पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात आहे. दरम्यान, भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आपल्या संरक्षण बजेटमध्ये 18 टक्क्यांपर्यंत वाढ करु शकतो. संरक्षण क्षेत्रात 2.5 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त खर्च होईल असा अंदाज आहे. पाकिस्तानसारख्या कमकुवत अर्थव्यवस्थेसाठी ही रक्कम मोठी गोष्ट आहे. दरम्यान, भारताने सिंधू पाणी करार रद्द करणे आणि व्यापारावर बंदी घालणे ही कृती पाकिस्तानसाठी अधिकच कठीण होत चालली आहे. त्याशिवाय, भारताने आज हवाई हल्लाही केला. अशा परिस्थितीत, आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानला फक्त सतर्क राहण्यासाठी दररोज सुमारे 4 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागत आहेत.
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारला सीमेवर सैन्य तैनात करण्यासाठी, विमानांसाठी इंधन देण्यासाठी आणि सीमेवर वस्तू पाठवण्यासाठी सुमारे 4 अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्याच वेळी, जर आपण पाकिस्तानच्या वार्षिक बजेटबद्दल बोललो तर ते सुमारे 2.10 लाख कोटी पाकिस्तानी रुपये आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असल्याने, केवळ हाय अलर्टवर पाकिस्तानचा अंदाजे खर्च 11253 कोटी पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

संबंधित बातम्या