मुंबई : दगाबाजांना माफी नाही, संजय राऊत विकृत – संजय उपाध्यायांचा घणाघात"

मुंबई : दगाबाजांना माफी नाही, संजय राऊत विकृत – संजय उपाध्यायांचा घणाघात
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

मुंबई : दगाबाजांना माफी नाही, संजय राऊत विकृत – संजय उपाध्यायांचा घणाघात"
भाजप नेते संजय उपाध्याय यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. “संजय राऊत हे विकृत आहेत, अशा व्यक्तीवर भाष्य करणं योग्य नाही,” असे उपाध्याय म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही आधीच स्पष्ट केलं होतं की दगाबाजीला माफी नाही. त्यामुळेच आज त्यांना पश्चाताप होत असावा.”

विरोधकांच्या तिरंगा यात्रेवर टीका करताना ते म्हणाले:

  • “मला त्यांची कीव येते.”

  • “जर लोक रस्त्यावर उतरले आहेत, तर विरोधक घरी का बसले आहेत?”

  • “भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची वाट का पाहत आहात?”

  • “तुम्हीही तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरा, ‘भारत माता की जय’ म्हणत जल्लोष करा.”

 

 

संबंधित बातम्या