मुंबई: संजय राऊतांचा घणाघात: “भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थ ठरवून पाकिस्तान वाचवत आहे”  

मुंबई: संजय राऊतांचा घणाघात: “भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थ ठरवून पाकिस्तान वाचवत आहे”   
  • MG News
  • मे 11 2025

Share on  

मुंबई: संजय राऊतांचा घणाघात: “भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थ ठरवून पाकिस्तान वाचवत आहे”

            शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका करताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तानविरोधातील कारवाई अर्धवट सोडल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला जाब विचारला.

राऊत म्हणाले की, “ट्रम्प यांच्या सूचनेनंतर युद्धबंदी झाली हे खोटं नाही का? आमचे जवान शहीद झाले, तरीही ऑपरेशन सिंदूर अर्धवट सोडले गेले. कोणत्या अटींवर युद्ध थांबवलं, यावर पंतप्रधानांनी खुलासा करावा.”

ते पुढे म्हणाले, “मोदींच्या वक्तव्यात पाकिस्तानचे तुकडे करू अशी भाषा होती. मग तुकडे कुठे गेले? पाकिस्तानचे पंतप्रधान खुलेआम युद्ध जिंकल्याचे म्हणतात, आणि आपण शांत राहतो. देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर अब्रू गेली आहे.”

राऊतांनी आरोप केला की, “ही वेळ पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची होती. सैन्याचा मनोबल उंचावले असताना राजकीय नेतृत्वाने अचानक माघार घेतली. ट्रम्पसाठी देशाचे मनोबल उध्वस्त झाले. ट्रम्पला भारताच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुठून मिळाला?”

त्यांनी 1971 च्या युद्धाचा दाखला देत इंदिरा गांधींचं नेतृत्व आठवले. “तेव्हा अमेरिकेच्या दबावाला न जुमानता पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. आज मात्र ट्रम्पच्या इशाऱ्यावर कारवाई थांबते.”

राऊतांनी सरकारवर पाकिस्तानच्या उद्योगपतींच्या सुरक्षेसाठी युद्धबंदी जाहीर केल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली.

ते म्हणाले, “देशातील भावना दुखावल्या आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा राजीनामा मागितला पाहिजे. मोहन भागवत राष्ट्रभक्त असतील, तर त्यांनीही आवाज उठवावा.”

पाकिस्तानचा विजयाचा दावा: राऊतांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या युद्धविजयाच्या वक्तव्यावरही संताप व्यक्त केला. “पाकिस्तानच्या मिसाईलनी भारतात काय हानी केली? रामदेव बाबा लाहोरला फॅक्टरी उघडणार होते, मग कोण जिंकले?”


 

संबंधित बातम्या