मुंबई :  कु. अक्षरा वर्मा या गुणवंत विद्यार्थिनीचे आदित्य ठाकरेंकडून कौतुक

मुंबई :  कु. अक्षरा वर्मा या गुणवंत विद्यार्थिनीचे आदित्य ठाकरेंकडून कौतुक
  • MG News
  • मे 21 2025

Share on  

मुंबई :  कु. अक्षरा वर्मा या गुणवंत विद्यार्थिनीचे आदित्य ठाकरेंकडून कौतुक

        मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील एका विद्यार्थिनीने सर्व माध्यमांमधून पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणे सोपे वाटत असले तरी, प्रत्येक टक्का महत्त्वाचा असतो, असे ठाकरे म्हणाले. यशामागे सामूहिक आणि वैयक्तिक मेहनत असं देखील आदित्य ठाकरे यांनी नमूद केले की, या यशामागे आई-वडील, शिक्षक आणि स्वतः विद्यार्थिनीची मेहनत आहे. "यामुळेच मी आज तिचे अभिनंदन करायला आलो आहे," असे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. मुलीला मदत करण्याबाबत विचारले असता, आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, "अजून काहीही मागितले नाही. आपण पाहतो की ती तिच्या मेहनतीमुळे पुढे आली आहे." मदतीबाबत माध्यमांसमोर चर्चा करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छगन भुजबळ यांच्याविषयीच्या प्रश्नावर त्यांनी, "जी पहिली आली मला तिचे कौतुक जास्त आहे," असे उत्तर दिले. आमदार आणि युवासेना प्रमुख नेते आदित्य ठाकरे यांनी गुणवंत विद्यार्थिनीचे कौतुक करताना तिच्या मेहनतीचे आणि तिच्या यशाचे श्रेय तिच्या सामूहिक पाठबळाला दिले.
 

संबंधित बातम्या