मुंडेंचा गळा चिरला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून गुन्हेगारांचे क्रौर्य समोर

मुंडेंचा गळा चिरला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून गुन्हेगारांचे क्रौर्य समोर
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून, यामध्ये अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. आधी महादेव मुंडेंचा गळा कापला. तो तब्बल २० सेंमीपर्यंत लांब, ७ सेंमी रुंद आणि ३ सेंमी खोल असा हा वार होता.
त्यानंतर मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार केलेले होते. मुंडे यांच्या अंगावर तब्बल १६ वार आहेत. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

२१ ऑक्टोबर रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला होता. २२ ऑक्टोबर रोजी १२:१५ ते १:३० असे सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चालले. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियान, ब्राऊन कलरचा शर्ट होता. लाल करदोडा आणि पाकीट होते. चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. सव्वा तास हे पीएम चालले होते. या घटनेला तब्बल २० महिने लोटले त्यानंतरही यातील आरोपी निष्पन्न नाहीत. त्यामुळेच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचे वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे.

महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने त्यांची श्वसननलिका कापली गेली होती. शिवाय मोठ्या रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या.

महादेव मुंडे यांनी दोन्ही हाताने या सगळ्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ, तळहातावर आणि मधल्या बोटाजवळ जखमा झालेल्या होत्या.  तसेच खाली पडल्यानंतर त्यांच्या डाव्या गुडघ्यालाही खरचटलं असल्याची नोंद आहे.

मानेवर वार करत असताना तो चुकवल्यामुळे तोंडावरही वार झाल्याची शक्यता आहे. तोंडापासून कानापर्यंतही एक वार झाल्याचे यामध्ये सांगण्यात आलं असून, त्याची लांबी १३ सेंमी एवढी असून, रुंदी व खोली दीड सेंमीपर्यंत आहे.

डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

संबंधित बातम्या