सत्यजीत ने सत्य बोलणे सोडलंय-  विजय वडेट्टीवार 

 सत्यजीत ने सत्य बोलणे सोडलंय-  विजय वडेट्टीवार 
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही. त्यांना केवळ राजकारण करुन, सत्ता आणि खुर्ची यांना महत्वाची नाही.अवेळी पाऊस NDRF मध्ये बसत नाही, पण राज्य सरकराने SDRF मधून मदत करण्याची गरज आहे 
शेतकऱ्यांना मदत करा, नाही तर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हा शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही, इतकं मोठं संकट आलं असताना त्यांना मदतीची घोषणा नाही. रब्बी धान खरेदीची घोषणा नाही. कुठे आहे सरकार 
आम्हाला सरकारचं दिसत नाही.सरकार अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे केवळ हिंदू मुस्लीम करुन मतं मिळतात. जनता खड्ड्यात गेली तरी चालेल.

यापुढे ते वैष्णवी प्रकरणाबद्दल बोलतांना म्हणाले, त्या वकीलाला माहित नाही तो चुकीचं आणि तिचं चारित्र्य हवन करत असेल तर चुकीचं आहे. मी त्यांचा घरी जाऊन आलोय. फोटो बघीतले. मारण्याचे व्रण होते.आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या पोरीचा जीव गेला. वकिलाची भुमिका सत्याची असावी. कालचा युक्तिवाद बघीतला तर हे वाचणार नाही. भक्कम पुरावे उपलब्ध झाले आहेत.
सत्यजीत ने सत्य बोलणे सोडलं, तो आता असत्याचा बाजूनं चाललाय. सत्याची साथ सोडून असत्याचा साथ देणं, ही सत्यजीत कडून अपेक्षित नव्हतं. राहूल गांधी सर्वांना भेटत असतात. वेळ देतात. उठसूठ सगळ्यांना भेटत नाही. काही दिवसांपूर्वीच आम्ही भेटून आलो. दोन तास चर्चा झाली. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही. तसेच ते आशिष देशमुख यांच्याबद्दल बोलतांना म्हणाले,आशिष देशमुख सत्तेतील आमदार आहे. गृह खातं त्यांच्याकडे आहे. ते सत्तेतले आमदार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं आणि तस्करीचा बंदोबस्त करावा. मध्य प्रदेशातून दारु, गुटखा आणि रेतीची तस्करी होते. तिकडे कर कमी. महाराष्ट्राचं वाटोळं होतं. चोर चोरी करत आहे. त्यांचा बंदोबस्त करुन चोरी थांबवावे.
मणिपूर येथील राज्यपालांना १० आमदार भेटल्याची माहिती आहे. तिथल्या राज्यपालांना चॅापरनं जावं लागतं. मणीपुरची ही स्थिती या नालायक लोकांमुळे. हे सरकार होऊ नये. 
संजय राऊत यांच्याबद्दल ते बोलत होते की; भाजप भावनीक मुद्दे घेऊन लोकांना भ्रमीत करतात. भाजपची सरकार आहे. संजय राऊत म्हणतात तसं सावरकर यांना भारतरत्न द्यावा.
 

संबंधित बातम्या