पाकिस्तनात गेलेल्या मूळच्या नागपूरच्या असलेल्या ४३ वर्षीय सुनीता जमगडे भारतात परतल्या आहेत . त्या १४ मे रोजी कारगिलमधून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्या होत्या . चुकून सीमा ओलांडणाऱ्या नागरिकांना मूळ देशात परत करण्याची निहित प्रक्रिया भारत आणि पाकिस्तानात ठरवण्यात आली आहे त्या प्रक्रियेनुसार पाकिस्तानी रेंजर्सनी सुनीता भारताच्या ताब्यात दिले सुनीता मूळच्या नागपूरच्या असल्याने अमृतसरमध्ये याबाबतशून्य क्रमांकांची एफ आय आर नोंदवण्यता आलेली असून सध्या सुनीता अमृतसरला आहेत. त्यांना नागपूरला आणण्यासाठी नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशनचे पथक अमृतसरला रवाना झाले आहे. त्यांना नागपूरला आणल्यावर त्या हेरगिरी किंवा अन्य कोणत्या बेकायदशीर कृत्यासाठीपाकिस्तानात गेल्या होत्या याची चौकशी करण्यात येईल असे नागपूर पोलिसशानी सांगितले आहे. सुनीता जमगडे या मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे कुटंबीयांचे म्हणणे आहे