नांदेड : शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी सेलची बैठक पार पडली
नांदेडमध्ये शिवसेना ओबीसी आणि व्हीजेएनटी सेलची एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ओबीसी सेलचे शिवसेना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब केशवे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत ओबीसी आणि व्हीजेएनटी समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या समाजातील प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणारा सविस्तर अहवाल तयार करून तो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब केशवे यांनी दिली.
या बैठकीस विविध जिल्ह्यांमधून आलेले शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान समाजाच्या प्रगतीसाठी पुढील रणनीतीवरही चर्चा झाली.