नांदेड: वादळी वाऱ्याने केळी बागेचे झालेल्या नुकसानाची पाहणी.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याने फळबागाचे मोठे नुकसान झाले. या वादळी वाऱ्यामुळे नांदेड सह अर्धापूर मुदखेड या तालुक्यातील केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीच्या बघा अक्षरशः आडव्या झाल्या आहेत. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढणीला आली होती. अचानक वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेला मोठा फटका बसला. केळी सह आंबा आणि उन्हाळी पिकांचे देखील या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव तिडके पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.