नांदेड शहरात रविवारी शिवसेना ठाकरे गटाच्या दोन गटात वाद झाल्यानंतर, बुधवारी माजी महानगर प्रमुख बंडू खेडकर व शहर प्रमुख गौरव कोटगीरे यांना निलंबित करण्यात आले. यावर पत्रकार परिषद घेत नांदेड शहर प्रमुख हे म्हणाले की, रविवारी संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यात झालेल्या वादा वादीत मी फक्त सोडवा सोडवी केली. मी मारहाण सुध्दा केली नाही. यात माझा कोणताच गुन्हा नसताना मला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता निलंबनाची कारवाई केली. संपर्क प्रमुख हे पैसै घेतल्या शिवाय कोणतेही काम करत नसल्याचे त्यांनी पुराव्यासह पत्रकार परिषदेत सांगितले.