नांदेड : जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण
नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री उशिरा दुचाकी वर आलेल्या तिघांनी निलेश कल्याणकर यांना मारहाण केली आहे. निलेश कल्याणकर व त्याचा मित्र पाई चालत असताना, तिघांनी दुचाकीवरून उतरून रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण चालू असताना बघायची मोठी गर्दी होती. मात्र कोणीही या वादात पडले नसल्याचे पाहायला मिळाले.