नंदुरबार : जिल्ह्यात चौथ्या दिवशी हीअवकाळी पावसाचा जोरदार तडाका
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात आज चौथ्या दिवशी ही सायंकाळ च्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडात करत तब्बल अर्धा तास पासून पाऊस सुरू आहे. सगळीकडे जलमय वातावरण झाले होते. गेल्या तीन-चार दिवसांवर देखील अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावत 1 तास पाऊस पडला होता. आणि आज देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. आज देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सगळीकडे पाणी साचून राहिले. मे महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे गणित कोलमडले आहे.