नाशिक: शहरातून हद्दपार असलेली व्यक्ती हत्यारासह खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात

नाशिक: शहरातून हद्दपार असलेली व्यक्ती हत्यारासह खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात
  • MG News
  • सप्टेंबर 10 2025

Share on  

मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सुचना दिल्या आहेत. 
खंडणी पथकातील पोहवा दत्तात्रय चकोर व पोअं. राऊत यांना हद्दपार इसम नामे रिंकेश सोलंकी हा हत्यारासह बोरगड परिसरात फिरत असल्याची माहीती मिळाली होती.त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक ०९/०९/२०२५ रोजी १९.०८ वाजेच्या सुमारास ए.टी. पवार शाळेच्या बाजुला, मोकळया मैदानात, बोरगड, नाशिक येथे सापळा लावुन आरोपी रिकेश गणेश सोलंकी, वय २५ वर्षे, धंदा रिक्षा चालक, रा. बेलदारवाडी, बजाज शोरूमच्या समोर, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक यास ताब्यात घेतले.

या व्यक्तीकडून हत्यार जप्त करण्यात आले असून हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तसेच तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात कोणतीही परवानगी न घेता दिसून आला आहे. त्या अनुषंगाने त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, १४२ प्रमाणे म्हसरूळ पो. स्टे. येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त साो., मा.श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, मा.श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त सो. गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेपोउनि. दिलीप सगळे, श्रेपोउनि. दिलीप भोई, मसपोउनि. मंगला जगताप, पो.हवा. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, पो. ना. भुषण सोनवणे, पो.अं. चारूदत्त निकम, भरत राऊत, भगवान जाधव व मपोअं. सविता कदम यांनी केलेली आहे.


 

संबंधित बातम्या