नाशिक : ७१ वर्षांच्या मेंदूच्या दुखापत झालेल्या रुग्णाचा वाढदिवस किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये उत्साहात साजरा
१२ मे २०२५: ७१ वर्षीय पुरुष रुग्ण, ज्यांना नुकतीच एका अपघातात (RTA) डोक्याला दुखापत झाली होती, त्यांच्यावर किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे यशस्वीरीत्या कनझर्वेटिव्ह मॅनेजमेंट द्वारे उपचार करण्यात आले. उपचारांचे नेतृत्व डॉ. ईशान नेरकर, न्युरोसर्जन, यांनी केले.
खास गोष्ट म्हणजे, जेव्हा अपघात झाला, तेव्हा त्यांचा स्वतःचा ७१व्या वाढदिवस होता आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात ज्या दिवशी हा आनंद साजरा करायचा होता त्याच सकाळी अपघात झाला. आणि कुटूंबियाच्या आनंदावर विरजण पडलं परंतु ही बाब हॉस्पिटलच्या टीमला समजताच, त्यांनी रुग्णासाठी खास छोटेखानी वाढदिवसाचे आयोजन रुग्णालयातच केले.
डॉक्टर, नर्सेस आणि संपूर्ण वैद्यकीय टीमच्या उपस्थितीत रुग्णाने केक कापला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. हा क्षण रुग्ण , कुटुंबिय आणि हॉस्पिटलसाठी अत्यंत भावनिक ठरला.
"उपचार ही केवळ औषधांची बाब नसते, तर ती माणुसकीची आणि काळजीची गोष्ट असते," असे मत मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नगरकर यांनी व्यक्त केले.
रुग्ण सध्या स्थिर असून त्यांच्यावर योग्य देखरेखीत उपचार सुरू आहेत.
किम्स मानवता हॉस्पिटलने नेहमीच केवळ वैद्यकीय नव्हे तर भावनिक आणि मानसिक आधार देणाऱ्या सेवा दिल्या आहेत. ही घटना त्याचेच उत्तम उदाहरण असल्याचे किम्स मानवता हॉस्पिटल चे सीओओ डॉ निलेश सिंग म्हणाले.