नाशिक: इंदिरानगर येथे भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

नाशिक: इंदिरानगर येथे भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून
  • MG News
  • सप्टेंबर 25 2025

Share on  

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका कॉम्प्लेक्समधील कॅफेमध्ये बसलेल्या २२ वर्षीय तरुणावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. राशिद हारून खान (वय २२, रा. अंबड लिंक रोड, खाडी) असे मयताचे नाव आहे. 

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस उपायुक्तांसह इंदिरानगर पोलिसांसह शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. 
घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने काही वेळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मयताच्या नातेवाईकांनी या ठिकाणी आरडाओरड केल्याने कायदा व सुव्यवस्था उद्भवू नये यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

मयत राशिद खान हा अंबड लिंक रोडवरील एका फेब्रिकेशन दुकानात काम करीत होता. गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी कोणीतरी राशी द्यायला फोन करून बोलावल्यानंतर तो अंबड लिंक रोड वरून कॅफेमध्ये आला होता. नंतर अज्ञात पाच ते सहा गुंडांनी त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने कोयत्याने सभासप वार केले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.  

घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी खून करणाऱ्या टोळक्याचा शोध सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संबंधित बातम्या