नाशिक: गुन्हेगार चाऱ्या चारोस्कर खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात

नाशिक: गुन्हेगार चाऱ्या चारोस्कर खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात
  • MG News
  • सप्टेंबर 15 2025

Share on  

मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सुचना दिल्या आहेत. पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पथकातील पोहवा. दत्तात्रय चकोर यांना गंभीर गुन्हयातील आरोपी चाऱ्या चारोस्कर हा नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आज दि.१५/०९/२०२५ रोजी बोरगड, नाशिक परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले. 
सुरज उर्फ चाऱ्या निवृत्ती चारोस्कर, वय २६ वर्षे, हा चामार लेणी, बोरगड, नाशिक येथे दिसून आल्याने त्याला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले असून तो गेल्या ५ महिन्यांपासून फरार होता. त्याला पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
हि कामगिरी श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त. गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत, श्रेपोउनि. दिलीप सगळे, श्रेपोउनि. दिलीप भोई, पो.हवा. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पो.ना. भुषण सोनवणे, पो.अं. चारूदत्त निकम, भरत राऊत व मपोअं. सविता कदम यांनी केलेली आहे. 

संबंधित बातम्या