नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या आधीच शर्मा यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जलज शर्मा यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार काढून घेत त्यांच्याकडे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून आज दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात शर्मा यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.