नाशिक: गोदावरीत रिक्षा वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू

नाशिक: गोदावरीत रिक्षा वाहून गेल्याने चालकाचा मृत्यू
  • MG News
  • ऑक्टोबर 1 2025

Share on  

शहरातील पंचवटी परिसरात रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह व रिक्षा बाहेर काढण्यात यश आले आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीला गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचे स्वरूप आले आहे. यावेळी रिक्षा टाळकुटेश्वर मंदिराजवळून जात असताना अचानक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सापडली. क्षणात रिक्षा आणि चालकासह नदीच्या पात्रात ओढला गेला. पाहता पाहता हा प्रकार घडल्याने परिसरातील लोकांमध्ये मोठी धावपळ उडाली.

नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जवळपास तासभर चाललेल्या अथक प्रयत्नानंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात आली. त्याचबरोबर रिक्षाचालकाचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत रिक्षाचालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नदीकाठावरील लोकांना वारंवार प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक जण धोका पत्करून नदीकाठच्या भागात जात असल्याने अशा घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान असून, नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावे, असे प्रशासनाने आवाहनकेले आहे.

संबंधित बातम्या