नाशिक: फुलेनगरमध्ये गोळीबार : युवक गंभीर जखमी

नाशिक: फुलेनगरमध्ये गोळीबार : युवक गंभीर जखमी
  • MG News
  • सप्टेंबर 17 2025

Share on  

 पंचवटी परिसरातील फुलेनगरजवळील राहुलवाडी येथे एका युवकावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून, आरोपींच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या फुलेनगरजवळ राहुलवाडी हा परिसर आहे. या ठिकाणी रात्री एक वाजेच्या सुमारास या परिसरात राहणारा सागर विठ्ठल जाधव हा युवक परिसरात राहणारा सागर विठ्ठल जाधव हा मंगला एका ओट्यावर इतर सहकाऱ्यांसोबत बसलेला होता.या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून असलेल्या भांडणातून याच परिसरात राहणारे विकी उत्तम वाघ आणि विकी विनोद वाघ या दोघांसह त्यांच्या अन्य साथीदार या ठिकाणी आले. विकी उत्तम वाघ याने विकी विनोद वाघ याच्या सांगण्यावरून सागर विठ्ठल जाधव याच्यावर अचानक दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये सागर जाधव याच्या गालातून गोळी आरपार गेली, तर दुसरी गोळी मानेमध्ये अडकली. घटनेनंतर सागरला त्वरित उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

संबंधित बातम्या