नाशिक : आगामी कुंभमेळ्यासंदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज चर्चासत्र

नाशिक : आगामी कुंभमेळ्यासंदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज चर्चासत्र
  • MG News
  • ऑक्टोबर 16 2025

Share on  

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पुढाकाराने आगामी काळात होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील विविध संस्था, संघटना पदाधिकारी व नाशिकमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, आदर देवयानीताई फरांदे, आमदार सौ. सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार सौ. सरोजताई अहिरे आदिसह, खासदार, आमदार तसेच विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, एनएमआरडीए आयुक्त जलज शर्मा, जिल्ह्याधिकारी आयुष्य प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग व  विविध शासकीय अधिकारी यांच्या सोबत शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता हॉटेल द गेटवे ताज येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री रविंद्र मानगावे यांनी दिली.
सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात व्यापार उद्योग यांच्या विकास व वाढीसाठी खूप वाव आहे या भविष्यात तील होणाऱ्या उलाढाली संदर्भात शासनाबरोबर समन्वय साधून उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योग जागतिक स्तरावर कसा वाढवता येईल या विषयावर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे.
 महाराष्ट्र चेंबरद्वारे विविध स्तरावर जसे महानगरपालिका, राज्य शासन, रेल्वे सेवा, विमानसेवा या संदर्भात आगामी कुंभमेच्या पार्श्वभूमीवर पाठपुरावा करण्यात आला असल्याची माहिती उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली. 
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रात संरक्षण क्षेत्राशी निगडित क्लस्टर डेव्हलप करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या वतीने विस्तृत निवेदन देण्यात येणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले.
 उत्तर महाराष्ट्रात असलेल्या कृषी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्यात मुख्यत्वे कृषी माल निर्यात  यासंदर्भात असलेल्या संधी आणि चेंबरद्वारे  करण्यात येणाऱ्या विविध योजना यासंदर्भात माहिती अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी दिली.
 याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री रवींद्र मानगावे उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, तत्कालीन माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

संबंधित बातम्या