नाशिक : लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य , शरयु पिंगळे कर्णधारपदी.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेल्या लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेेत महाराष्ट्राच्या मुले व मुली संघाने लेक्रॉस राष्ट्रीय चॅंपियनशिप २०२५ हया स्पर्धेेत घवघवीत यश संपादन करीत कांस्य पदक (ब्रॉन्ज) पदक मिळाले आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावलेस्या नाशिक जिल्ह्यातील शरयु पिंगळे हीची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन २०२८ च्या ऑलिंपिक खेळामध्ये समाविष्ट असलेला खेळ असून लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली उत्तर प्रदेश
लेक्रॉस असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी लेक्रॉस राष्ट्रीय ज्युनिअर अँड सिनियर स्पर्धा २९ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान जॉन मिल्टन पब्लिक स्कूल (आग्रा) येथे संपन्न झाली. या स्पर्धेत देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून २८ संघ सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या १७ ते १९ या मुलींच्या गटात शरयु पिंगळे, डिंपल,परदेशी, गायत्री खाडे, प्रांजल बाबरीया, देविका ढोले, आदिती काकड, विना गायकवाड, आदिती खंदारे , सारा सय्यद, आस्था लाहोटी, आयत सय्यद, दिक्षा हिरे आदी खेळाडूंंचा संघ सहभागी झाला होती. संघातील सर्वच खेळाडू राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयातून असून ते लेक्रॉस स्पर्धेत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविलेले आहेत. तीसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सेमी फायनल मॅच मध्ये राजस्थान संघाला पराभुत करुन महाराष्ट्र संघाने यश संपादन करीत कांस्य पदक मिळाले. मुलींच्या संघाचे प्रशिक्षिका नागपूर येथील आस्था मॅडम यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. मुलांचा १७ ते १९ वयोगटाच्या संघानेही महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिले. या संघात राज्यातील शाहू पिंगळे, शंभु पिंगळे, गौरव खाडे, आदित्य जाधव, निशांत सोनवणे, तनिष्क मेसराज, दिशांत राऊत आदी खेळाडूंचा समावेश होता. मुलांच्या संघाचे कोच म्हणून सिंग, संदेश राठोड यांंनी काम बघीतले. तसेच खेळांडूना मानसिक व शारीरीक दृष्या प्रोत्साहन देण्यासाठी मा. अध्यक्ष राठोठ मॅडव व सेक्रेटरी बाबर सर व इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रशिक्षक म्हणून पीयुष सर, प्रतिक सर व इतरांनी संघासाठी खुप मेहनत घेतली. तसेच इतर राज्यातुन आलेले सर्व प्रशिक्षक, विध्यार्थी यांनी एकरूप होऊन हम सभ भाई भाई असे नारे लावुन दाखवून दिले. यातील दिंडोरी (नाशिक) येथील शरयु पिंगळे ह्या खेळाडूची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली असून व लेक्रॉस स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याने शरयु पिंगळे हीचे अभिनंदन होत आहे.