नाशिक : गोरेवाडी भागात युवकाचा खुन

नाशिक : गोरेवाडी भागात युवकाचा खुन
  • MG News
  • ऑक्टोबर 4 2025

Share on  

नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीतील गोरेवाडी परिसरात युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोरेवाडी परिसरात 2 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कृष्ण दीपक ठाकूर या युवकाचा खून करण्यात आला आहे.

रात्रीच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून युवकाचा निघृण खून करण्यात आला. रात्रीच्या वेळेस जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकांनी कृष्णा ठाकूर याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. खुनाच्या घटनेने नाशिकरोड परिसर हादरले असून युवकांमध्ये किरकोळ कारणांवरून होणारे वादातून, कोयते हल्ले, मारामाऱ्या, जीवघेणे हल्ले असे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील गोरेवाडीत राहणाऱ्या संतोष जाधव यांच्या घराच्या मागे जाधववाडी या ठिकाणी मोईन शेख यांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्याकडे असलेले धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीमागे खूपसून तसेच त्याच्या सोबत असलेल्या चिराग उर्फ मोगिली बारसे याने जेत्यांच्याकडील कोयत्याने कृष्णाच्या पाठीवर वार केले व प्रकाश उर्फ आशु बारसे यांनी देखील मोईन कडे असलेल्या धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीमागे खूपसले व यश बारसे याने कृष्णाला लाथा बुक्क्याने मारहाण करून सर्वांनी मिळून त्यास ठार मारले.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत रात्रीच संशयित मोईन शेख उपनगर, नाशिक, चिराग उर्फ मोगली बारसे, यश बारसे, प्रकाश उर्फ अशु बारसे. या चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. ज्योती मनोज अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहेत.

संबंधित बातम्या