नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी दहशत खंडणी च्या आरोपा खाली अटक झालेले सातपूर येथील लोंढे पिता-पुत्र यांच्या विरोधात काही तक्रारी असल्यास
नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी लोंढे पिता पुत्र टोळिला बळी पडलेल्या कामठवाडा खुटवडनगर येथील पुष्कर बंगल्याचे मालक यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे लोंढे टोळीने पुष्कर बंगला जबरदस्तीने बळकविल्याची तक्रार दाखल केली.
घटनेचा तपास करून अंबड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचा तपास करून पुष्कर बंगला सिल करण्यात आला.
लोंढे पिता पुत्र आणि त्यांचे सहकारी सनी विठ्ठलकर व निखिल निकुंभ यांनी कामटवाडा खुटवडनगर नाशिक येथील फिर्यादी यांचा पुष्कर बंगला 2021 मध्ये भाडेतत्त्वावर घेतला सदर बंगल्यावर चोलामंडलम कंपनीचे एक कोटी सत्तर लाख रुपये कर्ज असल्याचा फायदा घेऊन लोंढे पिता पुत्र आणि सह आरोपी यांनी बंगल्याचे मालक फिर्यादी यांना शिवीगाळ व धमकावून दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा मारला.
लोंढे पिता पुत्र यांच्या दहशतीला बळी पडणारे खुडवड नगर कामटवाडा येथील पुष्कर बंगल्याचे मालक फिर्यादी यांनी 8 ऑक्टोबर रोजी लोंढे पिता पुत्र आणि सनी विठ्ठलकर व निखिल निकुंभ यांच्याविरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता सदर प्रकार खंडणी, जबरदस्ती, दहशत निर्माण करून बंगल्यावर कब्जा करण्याचे लक्षात येताच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सदर बंगला हा सील करण्यात आला.
ही कार्यवाही अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे सह पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे व इतर पोलीस कर्मचारी यांनी पुष्कर बंगला येथे जाऊन अधिक तपास करून बंगला सील करण्यात केला
अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांना दिली.