नाशिक पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आरोपी सागर सोनार यास अटक

नाशिक पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आरोपी सागर सोनार यास अटक
  • MG News
  • सप्टेंबर 22 2025

Share on  

नाशिक पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कामगिरी करत आरोपी सागर हेमंत सोनार (वय २१, रा. शिवाजी नगर, जळगाव) याला अटक केली आहे.

पोलिस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिलेल्या सूचनेनुसार खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपीचा शोध पोना. भुषण सोनवणे व पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांनी घेतला. 
आज  सकाळी ११.३० वाजता खंडणी विरोधी पथकाने वक्रतुंड हॉस्पिटल, पाटील फाटा, नाशिक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा क्रमांक ५२७/२०२५, कलम ३/२५ भादंवि प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलिस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, श्री. किरणकुमार चव्हाण, उपायुक्त श्री. संदीप मिटके तसेच पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत जगवेंद्रसिंघ राजपूत, दिलीप सगळे, दिलीप भोई, मंगला जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारुदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत,व मपोअं सविता कदम तसेच पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
 या कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारीविरोधात कठोर पावले उचलल्याचे दिसून येत आहे.
 

संबंधित बातम्या