नाशिक: रेल्वे डाक सेवेच्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता जनजागृती प्रभात फेरी

नाशिक: रेल्वे डाक सेवेच्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता जनजागृती प्रभात फेरी
  • MG News
  • सप्टेंबर 22 2025

Share on  

 भारत सरकार आयोजित स्वच्छता पंधरवडा निमित्ताने नाशिक रोड रेल्वे डाक सेवेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता जनजागृती प्रभात फेरी आयोजित केली ."जन जन का एक हि नारा साफ सुथरा देश हो हमारा" असा संदेश या रॅलीत देण्यात आला. रॅली नंतर आपला परिसर ,देश स्वच्छ ठेवण्याची शपथ सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली.  या स्वच्छता रॅलीत उप अभिलेख अधिकारी राजेश खैरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर स्वच्छता जनजागृती रॅली यशस्वी होण्यासाठी  गुणवंत चव्हाण सहाय्यक, कैलास सोनवने ,रोशन तायडे ,रत्नाकर शेजवळ यांनी परिश्रम घेतले .रेल्वे डाक सेवेतील कर्मचारी बंधु व भगिनी यावेळी उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या